समतोल फाऊंडेशनमार्फत मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून समाजसेवा या विषयांतर्गत विचारांची देवाण-घेवाण या विषयावर ठाण्यातील नामवंत संस्थेच्या प्रतिनिधींसोबत चर्चात्मक कार्यक्रमाचे आयोजन

SourceSamtol Foundation    Date20-Mar-2021
Total Views |

मराठी भाषा दिनाला समाजसेवा या विषयांतर्गत ”विचारांची देवाण घेवाण”
 

समतोल फाऊंडेशनमार्फत मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून “समाजसेवा” या विषयांतर्गत विचारांची देवाणघेवाण या विषयावर ठाण्यातील नामवंत संस्थेच्या प्रतिनिधीसोबत चर्चात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या वेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच पुढील ध्येयधोरणे ठरविण्यात आली. यावेळी समाजसेवा करण्यामागचा नेमका उद्देश कसा असावा ? आणि ते करत असताना येणाऱ्या अडचणींवर कशी मात करावी इ.विषयावर चर्चा करण्यात आली. तसेच उपस्थित मान्यवरांनी समाजसेवा करत असताना त्यांना आलेले अनुभव सांगितले. यावेळी समतोल फाऊंडेशनचे संस्थापक विजय जाधव यांनी  उपस्थित लोकांना मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समतोल फाउंडेशनच्या तृषाली पवार यांनी केले तर कार्यक्रमाची सांगता श्री.निशिकांत महांकाळ यांनी केली.
यावेळी समतोल फाऊंडेशनचे संस्थापक श्री. विजय जाधव, राजेंद्र गोसावी, रविंद्र खानविलकर, ज्ञानेश्वर पाटील, अनंत आगरकर, नितीन देशपांडे, निशिकांत महांकाळ, अशोक यादव, सुभाष जैन, तुळशीदास मांजरेकर, संजय पिसाळ, मनिष नाखवा, राजश्री मनकुदळे, वीणा केसरकर, विद्या शिंदे, प्रा.अमिता कदम, तृषाली पवार इ.मान्यवर उपस्थित होते.

 
मराठी भाषा दिन बिशेष_1&nb