"मेरा भी सपना" महिला दिन विशेष

SourceSamtol Foundation    Date20-Mar-2021
Total Views |
"मेरा भी सपना" महिला दिन विशेष
 
८ मार्च २०२१, महिला दिनानिमित्त समतोलच्या मनपरिवर्तन केंद्रात कार्यक्रम आयोजित करण्यात आला खरतर महिला दिवस हा रोजचाच आहे. कुटुंबातील महिला म्हणजे होम मिनिस्टर असते. अनेक वेळा आपण घरात कोण कोणाला घाबरते असे विचारले तर पप्पा फक्त मम्मीला घाबरतात असे सहज मुले सांगतात. आर्थिक, मानसिक सर्वाचाच समतोल महिला राखत असतात म्हणून घरसुद्धा एक मंदिर होऊन जाते. परंतु सर्व ठिकाणी अशी परिस्थिती असेलच असे नाही म्हणून हा समतोल राखण्यासाठी महिला दिन साजरा केला जाऊ लागला. 
मान सन्मान, समानता, आत्मनिर्भर आणि पुरुषांच्या बरोबरीने काम करूनही जर हक्क आणि अधिकार मिळत नसतील तर आम्हीसुद्धा माणसच आहोत हे दाखविण्यासाठी हा महिला दिन उदयास आला
परिस्थितिला तोंड देत आपण सक्षमपणे लढण्यासाठी आपले विचार समाजात गेले पाहिजे त्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झाले पाहिजे आज निमित्त महिला दिनाचे परंतु समतोलने हे व्यासपीठ नेहमीच या स्रीशक्तीला दिले आहे आपले कुटुंब, बालक याबद्दल आपल्या भावना व्यक्त करीत "मेरा सपना" या विषयावर महिला आज बोलत होत्या
मुलांनी खूप शिकले पाहिजे, त्यांच्यावर संस्कार झाले पाहिजेत, ते पुढे गेले पाहिजेत यासाठी समतोल संस्था मुलांना घेऊन प्रयत्न करीत आहेत व त्यामध्ये आमची मुले आहेत त्यामुळे आम्हाला अजिबात चिंता नाही. आमचे मुलांबाबतचे स्वप्न नक्की पुर्ण होईल याची खात्री समतोलमध्ये आहे मुलांना खूप शिस्त आणि संस्कार होत आहे असे महिलांच्या तोडून म्हणजे मुलांच्या आईकडून व्यक्त झाले
महिला कार्यकर्ते सक्षमीकरण हे फक्त जिथे संस्थेमध्ये महिलेला सन्मान मिळतो तेथेच होऊ शकते आणि ते समतोल संस्थेमध्ये सर्वानाच मिळते असे महिला कार्यकर्ते रंजना रजपूत यांनी सांगितले
जास्तीत जास्त मदतीची गरज असलेल्या मुलांना आम्ही समतोलमध्ये आणुन सक्षम करण्यासाठी प्रयत्न करू असे समतोल कार्यकर्त्या अश्विनी भंडारे व राजश्री या महिलांनी बोलुन भावना व्यक्त केल्या
शरीरविक्री करणाऱ्या, भंगार वेचणाऱ्या, भीक मागायला जाणाऱ्या 15 महिला आज उपलब्ध होत्या
तृशाली पवार यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले तर समतोल संस्थापक विजय जाधव व सौ गीता जाधव यांनी मार्गदर्शन केले. सर्व समतोल महिला वर्ग आज मुले आणि महिला यांना आनंद देत घेत होते. विशेष म्हणजे सरळगाव येथून जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिकासुद्धा उपस्थित होत्या. युपीएससीची विद्यार्थीनी उत्कर्षा व आदिती यांनी समतोल सेंद्रिय शेतीचा आनंद आयुष्यात न विसरणारा आहे असे सांगितले
सर्वानी भोजनाचा आनंद घेऊन "मेरा सपना अपना अपना" म्हणत, आम्ही हाच समतोल राखण्यासाठी प्रयत्न करू असा आत्मविश्वास निर्माण करून सर्व महिलांनी निरोप घेतला 
 

मेरा भी सपना _1 &nbs
मेरा भी सपना _2 &nbs
मेरा भी सपना _3 &nbs
मेरा भी सपना _4 &nbs
मेरा भी सपना _5 &nbs
मेरा भी सपना _6 &nbs
मेरा भी सपना _7 &nbs