करू अन्नदान..भुकेल्याला देऊ समाधान

SourceSamtol Foundation    Date20-Mar-2021
Total Views |
करू अन्नदान..भुकेल्याला देऊ समाधान
समतोल फाउंडेशन ठाणे ही संस्था निराधार ,निराश्रित ,घरातून वेगवेगळ्या कारणांमुळे दुर झालेल्या ,हरविलेल्या फसवणूक करून आणलेल्या रेल्वे स्टेशनवरील अडचणीत असलेल्या मुलांचे पुनर्वसन करणारी संस्था गेले 16 वर्ष सातत्याने कोणत्याही फळाची अपेक्षा न करता सामाजसेवेत कार्यरत आहे.
गेले दोन वर्षे सिव्हिल हाँस्पीटलमध्ये अन्नछत्र चालवत आहे. यापुढे एका दिवसात अन्नछत्रच्या माध्यमातून ५०० पेक्षा जास्त बेघर, अनाथ लोकांना अन्नाचा कण सुखाने समाधानाने ग्रहण करण्यासाठी संकल्प करणार आहे . जे अन्नछत्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे थांबले होते ते आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने सुरू करण्यात आले. दिनांक ११ मार्च २०२१ रोजी अन्नछत्रचा श्रीगणेशा ठाणे येथे असलेल्या अपूर्वा महिला सामाजिक संस्थेच्या निराधार अनाथ बेघर गरजुंना अन्नदान करून करण्यात आला.
या प्रसंगी समतोल संस्थेचे संस्थापक श्री. विजय जाधव, समतोल फाउंडेशनचे समतोल मित्रत्व जपणारे श्री राजेंद्र गोसावी, श्री. अनंत आगरकर, एड महेश भालेकर, जेष्ठ पत्रकार श्री. सुभाष जैन हे सर्व मान्यवर उपस्थित होते.
सर्वांच्या मदतीने आज महाशिवरात्री खऱ्या अर्थाने साजरी करण्यात आली.
 

करू अन्नदान..भुकेल्याला द
करू अन्नदान..भुकेल्याला द
करू अन्नदान..भुकेल्याला द
करू अन्नदान..भुकेल्याला द
करू अन्नदान..भुकेल्याला द