एक दिवा समतोलसाठी ![]() एक दिवा समतोलसाठी दीपोत्सव हा दिव्यांचा सण. अंधारातून प्रकाशाकडे नेणारा दीप. या दिव्याचे आपल्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्व आहे. माणसाचे जन्मापासून मृत्यूपर्यंत दिव्याशी नाते जोडलेले आहे. दिवा ही मनुष्यजीवनाच्या विकासाचे प्रतिक आहे. म्हणूनच दिवाळीत सर्वत्र दीप लावून दिपोत्सव साजरा करण्यात येतो. प्रत्येक घरातील मूल हे दिवा आणि पणतीच्या रूपाने घरोघरी तेवत असतात आणि घराला प्रकाशमान करतात. पण काही वेळा कौटुंबिक अडचणीमुळे हीच मुले घरातून बाहेर पडतात आणि अंधाराच्या दिशेने प्रवास करतात. अशा मुलांचे पुन्हा कुटुंबात पुनर्वसन करण्याचे अविरत कार्य मागील १५ वर्षापासून समतोल करीत आहे. समतोल कार्याची ही ज्योत ज्योतीने वाढविण्यासाठी व अंधाराच्या दिशेने प्रवास करणार्या मुलांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करण्यासाठी या मुलांच्या समवेत आपण सारे मिळून दीपोत्सव साजरा करू या! समतोलच्या अंगणात समतोल कार्याचा एक दिवा एक ज्योत उजळ्वू या. समतोल फाउंडेशन २०२० मध्ये आपल्या कार्याची १५ वर्षे पूर्ण करीत आहे. त्यामुळे या दीपोत्सवासोबत समतोल आपला १५ वा स्थापना दिवस साजरा करीत आहे. दिनांक ३० नोव्हेंबर २०२० ठिकाण : स्वामी विवेकानंद मन परिवर्तन केंद्र, कल्याण मुरबाड रोड, मामणोली, कल्याण . वेळ : सायंकाळी. ४ ते ७
|